बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:11 AM2017-08-17T00:11:50+5:302017-08-17T00:11:57+5:30

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

Government is committed to the welfare of the victims - Phundkar | बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध- फुंडकर

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध- फुंडकर

Next
ठळक मुद्दे भारतीय स्वातंत्र्याचा ७0 वा वर्धापन दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा ७0 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा आदींची उपस्थिती होती.
    छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अमलात आणून शासन शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, या योजनेनुसार दीड लाख रुपयांपयर्ंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८0 शेतकर्‍यांना ११८.६१ कोटी रुपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत  जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रांवर ४९ हजार ८११ शेतकर्‍यांची एकूण ८.८९ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात ४२८.३८ लाख रुपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहेत.  जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हाभरात  सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यासाठी पात्र ठरलेल्या सहा हजार ८३६ अर्जांपैकी ३ हजार ९८२ शेततळ्यांना कायार्रंभ आदेश दिले आहे. त्यापैकी २0९८ शेततळी पूर्ण झालेली आहेत, तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ९ हजार २१ विहिरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९२४ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच सन २0१६-१७ मध्ये खरीप हंगामात ३.८७ लाख शेतकर्‍यांनी ३.२६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे.  कृषि व संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या ४९ गावांजवळून जात आहे. या महामार्गावर जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार आहे. महामार्गामुळे जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, लोणार व दे. राजा तालुक्यांसोबतच संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे. संचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाजभूषण पुरस्कारप्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची उपस्थिती होती. 

Web Title: Government is committed to the welfare of the victims - Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.