सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:47 PM2018-12-09T13:47:39+5:302018-12-09T13:48:12+5:30

खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

Government forgets Bhausaheb's work - Radhakrishna Vikhe Patil | सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर काढण्यात येत असलेली जनसंघर्ष यात्रा  खामगावात ८ डिसेंबररोजी संध्याकाळी ७ वाजता पोहचली. यानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत जाहिर सभेत ते बोलत होते. 
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे  सहप्रभारी तथा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,  प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर,  बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड,  जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे,  खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, विजय अंभोरे, आमदार यशोमती ठाकूर, खामगाव माजी नगराध्यक्ष अशोक सानंदा, साजीदखान पठाण, बाळापूरचे माजी आमदार खतीब, औरंगाबादचे आमदार सत्तार, अतूल लोंढे, आशिष जैन यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना विखे पाटील यांनी जिल्हयासह राज्यातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. शेतकरी, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना सरकारला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकºयाने कांद्याची मनीआॅर्डर पाठवूनही दु:ख कळले नाही. उलट त्यांनी शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे याची चौकशी सुरु केली. सरकारने आता देवांनाही सोडले नाही अशीही टिका त्यांनी केली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनतेचे सज्ज राहावे. २०१९ च्या निवडणूकीत भाजपाला जागा दाखवण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले. तत्पूर्वी नाना पटोले, आमदार सत्तार, आशिष जैन, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ  यांनीही भाषणातून भाजपाचा विविध उदाहरणे देत समाचार घेतला. आभार प्रदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Government forgets Bhausaheb's work - Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.