लोणार येथील शासकीय गोदामात स्वस्त धान्यच उपलब्ध नाही; ४७ स्वस्त धान्य दुकानदार धान्यापासून वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:23 PM2017-12-21T14:23:14+5:302017-12-21T14:24:00+5:30
लोणार : शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या येत आहेत.
लोणार : शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या येत आहेत. यापुढे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी व खºया लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी विविध प्रयत्न करतण्यात येत आहेत; मात्र लोणार येथील शासकीय गोदामात स्वस्त धान्यच उपलब्ध नसल्याने ९६ पैकी ४७ स्वस्त धान्य दुकानदारांना मालच मिळाला नसल्याने हजारो लाभार्थी महिना होत आला तरी स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. पिओएस मशीनमध्ये आधार लिंक करण्यात आलेल्या राशनकार्ड धारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अंगठ्याचा ठसा मॅच झाल्यावरच त्याला योजनेचे धान्य पुरवठा केले जाणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होऊन खºया लाभार्थ्यालाच धान्य मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत अंत्योदय, बीपीएल, एपीएल रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे दर महिन्याला अत्यल्प दरात धान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र शासनाच्या या योजनेला लोणार तालुक्यात खीळ बसलेली दिसून येत आहे. लोणार येथील शासकीय गोदामात स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यासाठी मालच नसल्याची बाब स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुका अध्यक्ष भगवान कोकाटे यांनी गोदामाला भेट दिली असता उघडकीस आली आहे. त्यामुळे ४७ स्वस्त धान्य दुकानदारांना मालच मिळाला नसल्याने दिसून आले. याबाबत पुरवठा निरीक्षक ए.एफ.सय्यद यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस माहिती सांगितली नाही.
पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रार वारंवार शासनाकडे होत आहे. या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करण्यात आला. मात्र धान्यच उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहे.
- भगवान कोकाटे, तालुका अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार,लोणार.
हमाल संघटनेच्या सुरु होणाºया संपामुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. परिणामी लोणार येथील शासकीय गोदामात माल येऊ शकला नाही. - ए.एफ.सय्यद, पुरवठा निरीक्षक, मेहकर .