शासकीय धान्य वाहतूक करणारे वाहन 'आरटीओ'ने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:26 PM2019-07-10T12:26:12+5:302019-07-10T12:26:16+5:30

शासकिय गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या एमएच- ३१ -एपी- ३३५३ क्रमांकाच्या वाहनाची खिळखिळी अवस्था बघून मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली.

 Government grain transport vehicle was caught by RTO | शासकीय धान्य वाहतूक करणारे वाहन 'आरटीओ'ने पकडले

शासकीय धान्य वाहतूक करणारे वाहन 'आरटीओ'ने पकडले

googlenewsNext


बुलडाणा : स्वस्त धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता चालकाकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने मोटार वाहन निरीक्षकांनी ९ जुलै रोजी चालकास मेमो दिला असून बुधवारी त्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
जिल्ह्यातील शासकिय धान्य वाहतूकीचा ठेका अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने घेतलेला आहे. खामगाव येथील एफसीआयच्या गोदामातून जिल्ह्यातील १६ गोदामामापर्यंत व गोदामातून सर्व रेशन दुकानदारांना द्वार पोहोच योजनेंतर्गत माल पोहोचविण्याची जबाबदारी याच संस्थेची आहे. ठेकेदारास शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक एफ. एस. शेख, चालक जाधव सकाळी गस्तीवर होते. शासकिय गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या एमएच- ३१ -एपी- ३३५३ क्रमांकाच्या वाहनाची खिळखिळी अवस्था बघून मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी चालक समीर शेख याच्याकडे वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, टॅक्स, पीयुसी आदी कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांनी चालकास मेमो देऊन बुधवारी कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. यापूर्वीही श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एका वाहनास आरटीओने खामगाव येथे पकडले होते.
 

शासकिय धान्याची वाहतूक करणाºया वाहन चालकाकडे वाहन परवाना, योग्यता प्रमापत्र, कर भरणा पावती, पीयुसी आदी कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे त्यास मेमो दिला असून बुधवारी आरटीओ कार्यालयात बोलावले आहे. कागदपत्रांची तपासणी करुन कारवाई करण्यात येईल.
- एफ.एस.शेख
मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा.

Web Title:  Government grain transport vehicle was caught by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.