कापूस खरेदीसाठी शासनाच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:52 AM2020-04-28T11:52:53+5:302020-04-28T11:52:58+5:30

संकलन केंद्राच्या मालकांशी शासकीय यंत्रणेकडून संपर्क सुरू झाला आहे.

Government moves to buy cotton! | कापूस खरेदीसाठी शासनाच्या हालचाली!

कापूस खरेदीसाठी शासनाच्या हालचाली!

Next

- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : राज्यासह विदर्भ व जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्रावर रुई उताऱ्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या अडचणी मुळे कापूस खरेदी बंद असल्याची बाब ‘ लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र सोमवार २७ एप्रिलला सुरू करण्यात आले असून इतर संकलन केंद्राच्या मालकांशी शासकीय यंत्रणेकडून संपर्क सुरू झाला आहे. जिनिंग मालकांनी आपल्या अडचणींचा पाढा प्रशासकीय यंत्रणेसमोर ठेवला असून यातून तोडगा काढत कापूस संकलन केंद्रे सुरू होण्याची आशा बळावली आहे.
लोकमत'ने ‘कापूस खरेदीसाठी उतारा निकषाची अडचण’ व ‘एप्रिल अखेर शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस’ या वृत्तातून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकºयांच्या अडचणींचे वास्तव मांडले होते. यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या हालचाली सुरू झाल्या असून जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचा पत्रव्यवहार जिनिंग मालकांशी सुरू झाला आहे. दरम्यान कापूस पणन महासंघाच्या वतीने देऊळगाव राजा येथे सोमवारी कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण नऊ कापूस संकलन केंद्रे असून पणन महासंघाकडे शेगाव, जळगाव जामोद, देऊळगाव राजा व देऊळगाव मही ही चार केंद्रे आहेत.त्यापैकी शेगाव केंद्र एक आठवड्यापूर्वी नाममात्ररीत्या सुरु करण्यात आले होते. आता देऊळगाव राजा केंद्र सुरू झाले आहे. जळगाव जामोद व देऊळगाव मही या संकलन केंद्राचा विषय अद्याप बाकी आहे.


रुई उताºयाचे निकष बदलविणे व नॉन एफ ए क्यू कापूस खरेदी करणे याबाबतचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयच घेऊ शकते .या वर्षी लॉक डाउन च्या पृष्ठभूमीवर कापूस खरेदी लांबल्याने व खुल्या बाजारात कापसाला अत्यल्प भाव असल्याने कापूस उत्पादकांना काही प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. पणन महासंघाची कापूस संकलन केंद्रे सुरू होत आहे. तर काही केंद्रे सुरू झाली आहेत.
- अँड.प्रसेनजित पाटील, उपाध्यक्ष, पणन महासंघ, मुंबई.

Web Title: Government moves to buy cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.