सरकारी कार्यालय ओस;कामाशिवाय येण्यास प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:30+5:302021-02-27T04:46:30+5:30
सिंदखेडराजा: कोरोनाचा इफेक्ट दिसायला लागला असून शहरातील सर्व शासकीय कार्यालयात कामाशिवाय येण्यास प्रतिबंध घातला जात आहे. त्यामुळे सर्वच कार्यालय ...
सिंदखेडराजा: कोरोनाचा इफेक्ट दिसायला लागला असून शहरातील सर्व शासकीय कार्यालयात कामाशिवाय येण्यास प्रतिबंध घातला जात आहे. त्यामुळे सर्वच कार्यालय परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
तहसील कार्यालय परिसरात दररोज हजारो लोकांची गर्दी असते. खरेदी,विक्री व्यवहार,जमिनीची कागद पत्रे,अभिलेख काढण्यासाठी होणारी गर्दी अशा एक ना अनेक कामासाठी लोक या परिसरात गर्दी करतात. परंतु कोरोनाचे निर्बंध कडक झाल्याने तहसील कार्यालयाचे मुख्य गेट बंद करून काम असलेल्या व्यक्तीलाच आत सोडले जात आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचा ओढा कमी झाला असल्याने आणि त्यात १५ टक्के किंवा १५ कर्मचारी उपस्थितीचे निर्बंध असल्यानेही सरकारी कामांवर परिणाम झाला आहे. सिंदखेडराजा शहर व तालुक्यात तुलनेने कोरोना रुग्ण कमी आहेत. चार साडेचार टक्के रुग्ण वाढ असल्याने त्याचा मोठा परिणाम तालुक्यात जाणवत नाही. असे असले तरीही प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केल्याने ग्रामीण भागातील लोक शहरात येताना दिसत नाहीत. दरम्यान,आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत फिरून शहरात कोरोना चाचणी करीत आहेत. मागील वर्षी कोरोनाची भीती लोकांमध्ये होती. तशी भीती यावर्षी जाणवत नसल्याने नागरिक चाचणी करून घेण्यासाठी स्वतः हून पुढाकार घेताना दिसत आहेत.