शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:35 AM2017-09-07T00:35:41+5:302017-09-07T00:35:47+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.

Government to raise the agitation against the government for justice! | शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

googlenewsNext
ठळक मुद्देवस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा  इशारा सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे आंदोलन  उभारणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक पुण्यात ३0 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  ४ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर शासनाचा  बंगला, गाडी सोडल्यानंतर ते मुंबईहून एसटीने  बुलडाणा येथे दाखल झाले. यावेळी स्वाभिमानीच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. याबाबत स्वाभिमानीची पुढील भूमिका स्पष्ट  करण्यासाठी येथील विश्राम भवनात ६ सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  स्वाभिमानीची बबनराव चेके, गजानन बंगाळे,  कौलास फाटे,  राणा चंद्रशेखर चंदन, जनार्धन  शिवणेकर, भगवान मोर,  गिरधर देशमुख,  डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे आदी  स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आपण सत्ता  भोगण्यासाठी सरकारमध्ये गेलो नव्हतो, शेतकर्‍यांचे  भले व्हावे, त्यांना न्याय मिळावा, अशी आपली  भूमिका होती; मात्र भाजपा सरकारने निराशा केली.  त्यामुळे  केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा  देऊन स्वाभिमानी अधिकृतरीत्या एडीएमधून बाहेर  पडली आहे. आमचा कोणाला व्यक्तिगत विरोध  नसून, शेतकर्‍यांविषयी राबविण्यात येणार्‍या  धोरणाबाबत लढाई आहे, असेही तुपकर म्हणाले. 

Web Title: Government to raise the agitation against the government for justice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.