शासकीय वाहने बेवारस

By admin | Published: December 11, 2014 01:25 AM2014-12-11T01:25:24+5:302014-12-11T01:25:24+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार: स्पेअर पार्टची चोरी, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत.

Government vehicles unemployed | शासकीय वाहने बेवारस

शासकीय वाहने बेवारस

Next

बुलडाणा : कालबाह्य झालेली शासकीय वाहने नियोजनाच्या अभावामुळे निविदा प्रक्रिया राबवून विकली जात नाही. परिणामी, बहुतांश विभागाची वाहने बेवारस आहेत. या वाहनांमधील चांगले स्पेअर पार्टस लंपास करण्याची शक्कलही लढविली जात असून, या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
येथील बांधकाम जिल्हा परिषद, समाजकल्याण, कृषी, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि प्रशासकीय इमारतीच्या आदी विभागाने कालबाह्य वाहने विक्री न केल्याचे दिसून येते, त्यामुळे या वाहनातून सुटे भाग चोरीस नेण्यास चोरट्यांना सोयीचे झाले आहे. काही कालबाह्य वाहने अनेक वर्षांपासून इमारतीच्या बाहेर ठिकाणी ठेवण्यात आल्याने ते जमिनीत कुजत आहे.
जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभाग कार्यालयाच्या परिसरातही भरारी पथकाचे अनेक वाहने कालबाह्य झाली आहेत. ही वाहने भंगारात काढून विकण्यासाठी पुढील प्रक्रिया करण्यात आली नसल्याने ती वाहने गंजत आहेत. काही महाभागांनी चक्क वाहनांमधील इंजिन आणि अनेक सुटे भाग चोरीस गेल्यामुळे संबंधित विभाग प्रमुख त्या वाहनांचे परीक्षण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते.

Web Title: Government vehicles unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.