सरकारी ‘व्हॉटस् अप’ ग्रुप नको रे बाप्पा!, स्मार्ट फोनला ग्रामसेवकांची सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:21 PM2018-01-04T12:21:02+5:302018-01-04T12:22:29+5:30
स्मार्ट फोनमुळे माहितीचे आदान-प्रदान सुलभ झाले असले तरी, आजची सुविधा म्हणजे उद्याची डोकेदुखी ठरत असल्याने, ‘सरकारी व्हॉटस् अप ग्रुप नको रे बाप्पा’ म्हणत जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनी ‘स्मार्ट फोन’ला सोडचिठ्ठी दिल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
खामगाव: स्मार्ट फोनमुळे माहितीचे आदान-प्रदान सुलभ झाले असले तरी, आजची सुविधा म्हणजे उद्याची डोकेदुखी ठरत असल्याने, ‘सरकारी व्हॉटस् अप ग्रुप नको रे बाप्पा’ म्हणत जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनी ‘स्मार्ट फोन’ला सोडचिठ्ठी दिल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
व्हॉटस् अप मोबाईलमुळे संदेशाचे दळण-वळण गतिमान झाले असले तरी, शासकीय कर्मचाºयांना एकाचवेळी तीस-चाळीस शासकीय ग्रुपवरून येणाºया संदेशामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनी व्हॉटस् अप ग्रुपला गुडबाय करीत, स्मार्ट फोनचाही त्याग केल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एकाचवेळी अनेक ग्रुपवर वरिष्ठांकडून आदेश, बैठकांच्या वेळा, धमकीवजा इशारे, रात्री-अपरात्री येणाºया मेसेजमुळे ग्रामसेवक वैतागले आहेत. दरम्यान, यामुळे वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक त्रासापायी ग्रामसेवकांनी सर्वच शासकीय ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेकडो ग्रामसेवकांनी या गु्रपला गुडबाय केला आहे. यामध्ये राज्यातील सुमारे २१ हजार ग्रामसेवकांचा समावेश असून, अनेक ग्रामसेवकांनी स्मार्टला त्यागत साध्या फोनचा वापर सुरू केला आहे.
वाढत्या ताणाचा परिणाम!
सरकारी कामकाजात व्हॉटस्अॅपचा वापर वाढला आहे. कामात गतिमानता यावी, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या अधिकाºयांनी काही ग्रुप तयार केले आहे. यामध्ये ग्रामसेवकांनाही सदस्य करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरील अधिका-यांसह, जिल्हा पातळीवरील आणि राज्यपातळीवरील अधिका-यांच्याही अत्यावश्यक ग्रुपमध्ये समावेश आहे. दरम्यान, यामुळे कामाचा ताण वाढत असल्याने, अनेक ग्रामसेवकांनी ग्रुपला गुडबाय केला आहे.
वरिष्ठ अधिका-यांचे राज्यस्तरावर ३०-४० ग्रुप आहेत. यापैकी चार ते पाच ग्रुपमधून एकाच वेळी वरिष्ठांकडून सूचना दिल्या जातात. आदेशही दिले जातात. कार्यालयीन कामकाज करावे, की, व्हॉटसअपवरील संदेश हाताळावे अशा दुहेरी पेचात सापडलेले ग्रामसेवक बाहेर पडले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
-प्रशांत जामोदे
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन