सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात!
By admin | Published: January 31, 2017 02:53 AM2017-01-31T02:53:57+5:302017-01-31T02:53:57+5:30
सहा महिने कारावासाची शिक्षा
मोताळा, दि. ३0- सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिधोरा जहाँगीर येथील दोघांना सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी सुनावली.
बोराखेडी सर्कलचे मंडळ अधिकारी दामोदर ङ्म्रीराम बोर्डे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये सन २00८ साली लिंबाजी दलपत सुरडकर व गणेश दलपत सुरडकर दोघे रा. रिधोरा जहाँगीर यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. सोमवारी दंडे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट मोताळा यांनी सदर गुन्हय़ाचा निकाल दिला आहे. दोन्ही आरोपींना सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अँड. बकाल यांनी काम पाहिले. गुन्हय़ाचा तपास मोरे यांनी केला.