सरकारचे धोरण हेच शेतकरी आत्महत्यांचे कारण - वडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST2017-10-23T00:10:45+5:302017-10-23T00:10:49+5:30
सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले.

सरकारचे धोरण हेच शेतकरी आत्महत्यांचे कारण - वडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले.
शेतकर्यांचा कल्याणकारी बळीराजाचा इतिहास युवा पिढीच्या मेंदूत जतन करण्यासाठी लोकजागर परिवाराच्या वतीने आयोजित ‘वंदन पेरत्या हाताला’ या शेतकरी स्मृती गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हनून शेतकरी नेते लक्ष्मण वडले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर, तेजराव चेके यांच्यासह विनोद वाघ, सरपंच रामदास कहाळे, दीपक कायंदे, पंढरी दराडे, अश्वीन सानप आदी उपस्थित होते. बळीराजाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना वडले म्हणाले की, घटनेमध्ये दोनशेपेक्षा जास्त कायदे हे शेतकरीविरोधी करून ठेवले असल्याने शेतकर्यांच्या मालाला भाव नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी आमच्या उन्नतीकडे लक्ष देत नाही. या देशाला अन्यधान्य आम्ही पुरवतो हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हा आज मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण करू शकत नाही. त्यामुळे आमच्या मुला-मुलींनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतात. आमच्या मायमावल्यांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार होत आहेत. एकीकडे आमचे रात्रंदिवस काम करण्याने रक्त आटत आहे तर भांडवलदार गब्बर होत आहे. हे सरकार आम्हाला फक्त अश्वासनावर भुलवणारे आहे. ६0 वर्षामध्ये जेवढे काँग्रेसने लुटले नाही तेवढे यांनी नोटाबंदीतच लुटले. नोट बंदीमध्ये अनेक जन रांगा करून मरण पावले; पण हे मोठमोठाले व्यापारी, पुढारी भांडवलदार हे कधी रांगेत उभे राहिले, त्यांचे पैसे कधी बदलण्यात आले, असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच कर्जमाफीसाठी आम्हाला पती-पत्नीला थम्ब देण्यासाठी बंधन घालता तर भांडवलदारांचे कर्ज माफ करताना त्यांना असे बंधन का नाही? आम्हाला कर्जमाफी नको आमच्या घामाच्या पिकाला हमी भाव द्या. आता यापुढे सरकारने शेतकर्यांचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा देऊन शेतकरी व त्यांच्या युवा मुलांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अवाहन वडले यांनी केले.