हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:39 PM2019-03-02T18:39:59+5:302019-03-02T18:40:16+5:30

- सोहम घाडगे बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा ...

Gram grower has to bear loss of one thousand on per quintal | हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

Next

- सोहम घाडगे
बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नवीन हरभरा, तूर दाखल होताच भाव घसरले आहेत. हमीभाव मिळत नसल्यामुळे हरभरा उत्पादकांना प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. 
एकीकडे रासायनिक खते, कीटकनाशकांचे भाव वाढत असताना शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत  दर मिळत होता. मात्र नवीन हरभरा दाखल होताच हरभºयाचे दर ३ हजार ते ३ हजार ७०० वर आले आहेत. त्यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांनी दर घसरले आहेत. शासनाचा हमीभाव ४४०० रुपये आहे. हमीभावापेक्षा १  हजार ४००  रुपयांनी कमी दराने हरभरा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी नुकसान होत आहे. आधीच दुष्काळामुळे या भागात शेतमालाचे उत्पादन घटले असून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. यंदा दुष्काळाने सर्वच शेतमालाचे उत्पादन अत्यल्प झाल्याने दर चांगले राहतील, अशी शेतकºयांना अशा होती. परंतू त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. 
परिसरात हरभरा उत्पादक शेतकºयांची मोठी संख्या आहे. यंदा बहुतांश शेतकºयांना खरिपातून उत्पादन खर्चही हाती लागला नाही. त्यामुळे हरभºयावर शेतकºयांची मदार होती. शेतमालाचे दर स्थिर नसल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.  हरभºयाबरोबरच तुरीचेही दर चांगलेच घसरले आहेत. तुरीला सुरुवातीला ५ हजार ३०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तुरीला ४ हजार ते ४ हजार ९०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल मागे दरात घसरण झाली आहे. तुरीला हमीभाव ५ हजार ६७५ रुपये आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. 

 
नाफेड बंद; शेतकरी त्रस्त
बुलडाणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी व्यापारांना तूर विकत आहेत. व्यापाºयांकडून कमी दर मिळत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. बुलडाण्याचे केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे व्यापारी परिस्थितीचा गैर फायदा घेत आहेत. यामाध्यमातून  शेतकºयांची लूट होत केली जात आहे.  बुलडाणा येथे तूर, हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकाºयांकडे केली आहे. 

 
असा आहे हमीभाव 
शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. शासनाच्या हमीभावाप्रमाणे हरभरा ४ हजार ४००, तूर ५ हजार ६७५, सोयाबीन ३ हजार ३९९, ज्वारी २ हजार ३४०, मका १ हजार ७००, उडीद ५ हजार ६००, मूग ६ हजार ९७५ असा दर आहे. मात्र व्यापाºयांकडे एवढा भाव मिळत नाही. पैशांची गरज असल्याने शेतकºयांना कमी भावात माल विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. 
 

Web Title: Gram grower has to bear loss of one thousand on per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.