बुलडाणा जिल्हयातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक : नामनिर्देशनपत्र प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:05 IST2018-02-04T20:01:03+5:302018-02-04T20:05:41+5:30
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार आहेत.

बुलडाणा जिल्हयातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक : नामनिर्देशनपत्र प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी निवडणूक लढविणा-या उमेदवाराचे पारंपारिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. जिल्हयातील तीन सार्वत्रिक व १०२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूकीची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.