Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:17 PM2021-01-19T12:17:19+5:302021-01-19T12:17:25+5:30

Gram Panchayat Election Results: मतदारांनी तरूणांना संधी देत प्रस्थापितांना धक्का दिला.

Gram Panchayat Election Results: Opportunity for youth leadership | Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे लांबलेल्या ४९८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सोमवारी धक्कादायक निकाल समोर आले. मतदारांनी तरूणांना संधी देत प्रस्थापितांना धक्का दिला. प्रत्येक फेरीमध्ये उत्सुकता वाढविणाºया निकालात काही ठिकाणी उमेदवारांची सरशी झाली. त्याचवेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांना सपाटून मार खावा लागला.   
४९८ ग्रामपंचायतींच्या ९ हजार २२९ उमेदवारांसाठी सोमवारी  १३ तालुक्यांच्या मुख्यालयी सकाळी नऊ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.   मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पेढे भरवित, गुलालाची उधळणही करण्यात आली. खामगाव तालुक्यातील बहूतांश मोठ्या गावांमध्ये काँग्रेस समर्थीत पॅनलने विजय मिळविला असून, भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यात तीन ठिकाणी इश्वरचिठ्ठीने निवड झाली. तर १२५ उमेदवार अविरोध झाले. तसेच तीन जागांसाठी अर्जच आले नव्हते. मलकापूर तालुक्यात  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस विचारसरणीचा वरचष्मा असल्याचे नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचे खामगावात स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, भारिप बहुजन महासंघ कार्यालयात विजयी उमेदवारांना पेढे भरविण्यात आले. गांधी चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात विजयी उमेदवारांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 
गावातील शांतता भंग करणाऱ्या आणि विकास कामांना खो देणाऱ्या राजकारण्यांच्या पॅनेलला अनेक बड्या ग्रामपंचायतीत ब्रेक दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत मातब्बरांना चपराक बसली आहे.  
सिंदखेड राजा तालुक्यात पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी महत्वाच्या ग्रामपंचायतींवर राष्टवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे तसेच ग्रामस्थांना विकासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. 
लाेणार तालुक्यात कही खुशी तर कही गमची स्थिती आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी युवकांना संधी दिल्याचे चित्र आहे. चिखली तालुक्यात अमडापूरसह काही ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मादणी गावात शिवसनेने वर्चस्व मिळवले आहे. मेहकर तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्षांनी हिवरा खुर्द गावात वर्चस्व राखले आहे. 
बुलडाणा तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या देउळघाट ग्रामपंचायतमध्ये काॅंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी विजय मिळवल्याचा दावा केला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी ४९८ पैकी बहुतांश ग्रामपंचातींमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या विचारांच्या पॅनलनी विजय मिळवल्याचे सांगितले.
 

Web Title: Gram Panchayat Election Results: Opportunity for youth leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.