ग्रामपंचायत निवडणूक, १३ हजार ३६२ उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST2021-01-01T04:23:53+5:302021-01-01T04:23:53+5:30
दरम्यान बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ५१३ जागांसाठी १,५७२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीमधील ...

ग्रामपंचायत निवडणूक, १३ हजार ३६२ उमेदवारांचे अर्ज
दरम्यान बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ५१३ जागांसाठी १,५७२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीमधील ५५८ जागांसाठी १,४४७, देऊळगाव राजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या २२४ जागांसाठी ५९७, सिंदखेड राजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या ३५७ जागांसाठी ९५६, लोणार तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ८८ जागांसाठी ४२५, मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या ३६७ जागांसाठी १,१५३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त खामगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमधील ६५७ जागांसाठी १,८०४, शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमधील २९२ जागांसाठी ८००, जळगाव जामोद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या २५७ जागांसाठी ६५४, संग्रामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या २६७ जागांसाठी ७४२, मलकापूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या २८७ जागांसाठी ७५७, मोताळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या ४७८ जागांसाठी १,२७२ आणि नांदुरा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या १५४ जागांसाठी १,१८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान सध्या अर्जांची छाननी सुरू असून उमेदवारी मागे घेण्याचा चार जानेवारी शेवटचा दिवस आहे.