बुलडाणा जिल्हय़ातील ग्रामपंचायत निवडणूक : छाननीमध्ये १६ अर्ज बाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:54 IST2017-12-13T01:53:27+5:302017-12-13T01:54:49+5:30
बुलडाणा: दुसर्या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे.

बुलडाणा जिल्हय़ातील ग्रामपंचायत निवडणूक : छाननीमध्ये १६ अर्ज बाद!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दुसर्या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे. दरम्यान, १४ डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्या दिवशी प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तूर्तास सदस्य पदाकरिता ९६४ नामांकन अर्ज आणि सरपंच पदाकरिता २७0 अर्ज पात्र ठरले आहेत.
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सदस्य पदाकरिता ९८0 तर सरपंच पदाकरिता २७१ जणांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात जिल्हय़ातील ११ तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींची ही निवडणूक १४४ प्रभागात होत असून, ३९७ ग्रामपंचायत सदस्य आणि ४३ सरपंच या प्रक्रियेतून निवडले जाणार आहे. प्रत्यक्षात २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २७ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यासाठी १५२ मतदान केंद्र राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
प्रचारासाठी दहा दिवस
प्रचारासाठी दहा दिवस निवडणूक रिंगणातील सदस्य व सरपंचांना मिळणार आहेत. नामांकन अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून त्यांचा निवडणूक खर्च विचारात घेणार आहे. दरम्यान, सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रा.पं.मध्ये प्रचारासाठी उमेदवाराला २५ हजार रुपयांची खर्च र्मयादा राहणार आहे. ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील उमेदवारांसाठी ३५ हजार रुपये खर्च र्मयादा राहणार आहे.
शुक्रवारी होईल चित्र स्पष्ट
शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी दुपारी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. त्यानंतर प्रत्यक्षात ४३ ग्रामपंचायतीमधील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास मात्र १३ आणि १४ डिसेंबरला कोण अर्ज मागे घेतो याकडे सध्या गावकीच्या राजकारणाचे लक्ष लागून आहे.
सरपंचपदाच्या उमेदवारासाठीची खर्च र्मयादा
सरपंच पदासाठीच्या उमेदवारासाठी ही खर्च र्मयादा ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ५0 हजार रुपये, ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एक लाख रुपये आणि १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात एक लाख ७५ हजार रुपये राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यातील निवडणूकीपासून ही र्मयादा वाढविण्यात आली आहे. उपरोक्त र्मयादेतच निवडणुकीचा खर्च संबंधित उमेदवारांना करावा लागणार आहे.