ग्रामपंचायत निवडणूक, लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:28 AM2021-01-04T04:28:31+5:302021-01-04T04:28:31+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात १३ हजार २७७ व्यक्तींनी १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात १३ हजार २७७ व्यक्तींनी १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान यातील १७९ उमेदवारांचे २१० अर्ज नामंजूर झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात १३ हजार ९८ उमेदवार आहेत. यापैकी किती जण ४ जानेवारीला अर्ज मागे घेतात, याकडे सध्या लक्ष लागले आहे.
१० लाख ३४ हजार मतदार
जिल्ह्यातील ६२ टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १० लाख ३४ हजार ३३ मतदार या निवडणुकीत ४७५१ उमेदवार १,७७१ प्रभागातून ते निवडून देण्यात येणार आहे. दरम्यान ५ लाख ४३ हजार ५११ पुरुष मतदार तर ४ लाख ९० हजार ५२२ महिला मतदार निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान करतील.
पक्षीय हस्तक्षेप वाढला
कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह अन्य पक्षही यावेळी निवडणुकीत सक्रिय झाले असून, गावपातळीवर आपले सदस्य कसे निवडून येतील, यासाठी अर्ज दाखल केलेल्या अनेकांची माघारीसाठी मनधरणी करत असल्याचे चित्र आहे.
दृष्टीक्षेपात निवडणूक
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : ५७०
निवडून द्यावयाचे एकूण सदस्य : ४,७५१
एकूण प्रभाग : १,७७१
उमेदवारी अर्ज दाखल करणारे एकूण उमेदवार:- १३,२७७
छाननीत अर्ज नामंजूर झालेले उमेदवारांचे अर्ज:- १७९
छाननीनंतर शिल्लक असलेले उमेदवार :- १३,०९८
एकूण मतदारांची संख्या:- १०,३४,०३३
महिला मतदारांची संख्या:- ४,९०,५२२
पुरुष मतदार:- ५,४३,५११