ग्रामपंचायत निवडणुकीचा आज कौल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:23+5:302021-01-18T04:31:23+5:30

मेहकर : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींंचे निकाल आज, सोमवारी जाहीर हाेणार आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून माेजणीस प्रारंभ हाेणार आहे. १४ ...

Gram Panchayat elections today! | ग्रामपंचायत निवडणुकीचा आज कौल !

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज कौल !

googlenewsNext

मेहकर : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींंचे निकाल आज, सोमवारी जाहीर हाेणार आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून माेजणीस प्रारंभ हाेणार आहे. १४ टेबलांवर २२ फेऱ्यांमध्ये ही मतमाेजणी हाेणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी ८०.९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये गावागावांत विजयाचा गुलाल कोणाला लागणार आहे, याची चर्चा रंगू लागली होती. प्रत्येकजण आपापल्या परीने विजयाची गोळाबेरीज करीत होता. कुणाला किती मते पडतील, कोण किती मतांनी आघाडी मारेल, या निवडणुकीत विजय आपलाच अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगत होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आज, सोमवारी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. मेहकर तहसील कार्यालयात सकाळी नऊपासून मतदान मोजणीस प्रारंभ होणार आहे. १४ निवडणूक निर्णायक अधिकारी, १४ टेबलवर एकूण २२ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावनेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायतींच्या ३१३ जागांसाठी एकून ७४९ उमेदवार रिंगणात होते. पॅनलप्रमुख, उमेदवार विजयाचे दावे करीत आहे; तर मतदान संपल्यानंतर उमेदवारांनी व पॅनलप्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी आकड्यांची जुळवाजुळव करीत विजय आमचाच असे दावे सुरू केले आहेत. मात्र मतदार राजाने आपल्या मताचा कौल कुणाच्या पारड्यात मत टाकले आहे, त्यावरूनच विजयाचे अंकगणित जुळून येणार आहे.

रस्ता राहणार बंद

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेपासून ते तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता वाहनधारकांसाठी बंद करण्यात आला आहे. उमेदवार व त्यांचा एक प्रतिनिधी यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

काेट

मतमोजणीदरम्यान उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा शांततेने स्वीकार करावा. निकालाच्या ठिकाणी शांतता ठेवून प्रशासनास सहकार्य करावे.

- डॉ. संजय गरकल,तहसीलदार, मेहकर

Web Title: Gram Panchayat elections today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.