ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:30 AM2017-10-07T01:30:33+5:302017-10-07T01:31:21+5:30
बुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्यांची उपासमार सुरू होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन, राहणीमान भत्ता व बोनस द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित दीड हजार कर्मचार्यांचे प्रलंबित वेतन व राहणीमान भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात जवळपास दीड हजार कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे, सफाई करून स्वच्छता ठेवणे आदी कामे करतात; मात्र कर्मचार्यांना मागील सहा महिन्यांपासून किमान वेतन वसुलीअभावी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ ग्रा.पं. कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबावर आलेली आहे. तसेच त्यांना महागाई भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे कुटुंबीयांचे पालन पोषण कसे करावे, अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे.
ग्रा.पं. कर्मचार्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याकरिता राहणीमान भत्त्यासह किमान वेतन दिवाळी अगोदर देऊन ग्रा.पं. कर्मचार्यांना दिवाळी बोनससुद्धा द्यावा. ज्या ग्रा.पं. कर्मचार्यांना दिवाळीअगोदर किमान वेतन, राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देणार नाही, अशा ग्रा.पं. ग्रामसेवकांचे वेतन व सरपंच मानधन देण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर गायकी, अध्यक्ष शिवसिंग सोळंकी, जि. सचिव रामेश्वर डिवरे, जि. संघटक सुरेश सपकाळ, संघटक पी.पी. पिसे आदींनी केली होती. याबाबत लोकमतने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुकाअ यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एक पत्र पाठवून ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी ग्राम पंचायतींनी १00 टक्के किमान वेतन, राहणीमान भत्ता स्वनिधीतून अदा करावे, तसेच दिवाळी बोनसबाबत वेतन, राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी माहे सप्टेंबर २0१७ पर्यंत अदा केल्यानं तर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.