ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सदस्यांचे गड कायम

By Admin | Published: May 30, 2017 01:15 AM2017-05-30T01:15:01+5:302017-05-30T01:15:01+5:30

नांदुरा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

Gram panchayat will continue to be a stronghold of the members of the bye-election | ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सदस्यांचे गड कायम

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सदस्यांचे गड कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये धानोरा (वि.) येथे संगीता सुभाष कोल्हे, सिरसोडी येथे ऊर्मिला अनगाईत, तर जिगाव येथे सुनीता मनोहर जुनारे या तीन महिलांनी विजय खेचून आणला.
तालुक्यातील दादगाव येथील एका जागेची पोटनिवडणूक अविरोध झाली. धानोरा (वि.) येथे योगिता संदीप गावंडे ह्या पंचायत समिती सदस्यपदी निवडून आल्याने रिक्त जागेवर त्यांच्याच गटाच्या संगीता सुभाष कोल्हे या २३७ पैकी १५९ मते मिळवून ८४ मतांनी विजयी झाल्या. जिगाव येथे सुनंदा वसंतराव भोजने ह्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्याने रिक्त जागेवर त्यांच्याच गटाच्या सुनीता मनोहर जुनारे ४२० पैकी २१९ मते मिळवून विजयी झाल्या. सिरसोडी येथे ऊर्मिला चेतन अंगाईत ३३८ पैकी १६७ मते घेत, पाच मतांनी विजयी झाल्या. विशेष म्हणजे येथे नऊ मते नोटाला पडली.
जिगाव व धानोरा (वि.) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांवरील निवडणूक प्रतिष्ठेच्या होत्या. संपूर्ण तालुक्याचे लक्ष या दोन जागांच्या निकालांकडे लागले होते. जिगाव येथे सुनंदा वसंतराव भोजने ह्या जिल्हा परिषद सदस्य झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्याच गटाचे सुनीता मनोहर जुनारे विजयी झाल्याने त्यांनी बाजू कायम राखली, तर धानोरा वि. येथे योगिता संदीप गावंडे पंचायत समिती सदस्य झाल्याने त्यांच्या रिक्त जागी त्यांच्याच गटाच्या संगीता सुभाष कोल्हे यांनी ८४ मतांनी दणदणीत विजय मिळवित बाजू कायम राखली.

Web Title: Gram panchayat will continue to be a stronghold of the members of the bye-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.