निमा संघटनेच्यावतीने भव्य मोफत औषधोपचार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:54+5:302021-04-15T04:32:54+5:30

बुलडाणा : कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निमा संघटना व सावित्रीबाई फुले नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव ...

Grand free medical camp on behalf of NIMA organization | निमा संघटनेच्यावतीने भव्य मोफत औषधोपचार शिबिर

निमा संघटनेच्यावतीने भव्य मोफत औषधोपचार शिबिर

googlenewsNext

बुलडाणा : कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निमा संघटना व सावित्रीबाई फुले नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने १३ एप्रिल रोजी दुपारी मोफत औषधोपचार व रोगनिदान शिबिर पार पडले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, सरचिटणीस नितीन शिरसाट, सिद्धार्थ आराख उपस्थित होते.

शिबिरात १५० रूग्णांनी विविध आजारावर उपचार करून औषधाचा लाभ घेतला. निमा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. गजानन पडघान, राष्ट्रीय सहसचिव डॉ. सोपान खर्चे, निमा वूमन फोरमच्या डॉ. वैशाली पडघान, डॉ. माधवी जवरे, आयुर्वेद कॉलेजचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. गायत्री सावजी, डॉ. संतोष रायकर यांनी औषधोपचार केला.यशस्वीतेसाठी निमा सचिव डॉ. प्रवीण पिंपरकर, मेडिकल प्रतिनिधी प्रवीण मोहर, अजय खोत यांनी औषधे उपलब्ध करून दिली. शिबिराला नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, सुचिता गवई, देवेंद्र खोत, विनोंद बेंडवाल, अशोक हिवाळे, गजानन झिने, यांचे सहकारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केली. कोविडच्या नियमानुसार शिबिर पार पडले.

Web Title: Grand free medical camp on behalf of NIMA organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.