प्लेटवरून ‘दादा’ निघेनात
By admin | Published: March 24, 2015 01:02 AM2015-03-24T01:02:49+5:302015-03-24T01:02:49+5:30
परिवहन विभागाचे दुर्लक्ष ; उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली.
खामगाव (जि. बुलडाणा): गाड्यांच्या नंबर प्लेटवर ह्यदादाह्ण, ह्यबाबाह्ण, ह्यभाईह्ण यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणार्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणार्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे; मात्र नोटीस बजावल्यानंतर आरटीओ, पोलिसांकडून गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे नंबर प्लेटवरील दादा, भाऊ, मोदी, पाटील ह्यजैसे थेह्ण असल्याचे चित्र आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार, फॅन्सी नंबर प्लेट लावणे गुन्हा ठरतो; परंतु शहरातील बहुतांश चारचाकी वाहनांवर दादा, बाबा, भाऊ, नमो, करण, पवन, पाटील, मराठा, आणि इतरही नावसदृश नंबर प्लेट आढळून येतात. इतकेच काय तर पोलीस ठाणे आणि जिल्हा न्यायालय परिसरातही अशा प्रकारच्या नंबर प्लेट असणार्या गाड्या पार्क केलेल्या आढळतात. दरम्यान, केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार नंबर प्लेट या इंग्रजी अरोबिक फॉन्टमध्येच असाव्यात, असे अधिसूचित केले आहे. त्याशिवाय हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी व इ तरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील दुरुस् तीला देशभरातील विविध राज्यांनी अंमलात आणले आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप दुरुस्ती लागू केलेली नाही. केंद्रीय कायद्यातील तरतुदींचे पालन व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्य सरकारांना सुधारित नियम लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई होत नसल्यामुळे शहरात फॅन्सी नंबरप्लेट लावणार्यांमध्ये स्पर्धाच लागली असल्याचे चित्र आहे.