व्यसनाधीन नातवाने आर्थिक वादातून केला आजीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:29 PM2020-09-04T12:29:59+5:302020-09-04T12:30:11+5:30
पैसे द्यावे असा तगादा आरोपी नामदेव नागरे साततत्याने त्यांच्याकडे लावत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: तालुक्यातील खुरमपूर येथे ९० वर्षीय आजीचा ४० वर्षीय नातवाने आर्थिक कारणावरून विळ््याने गंभीर स्वरुपात वार करून खून केल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी नातवा अटक केली आहे.
मात्र या घटनेमुळे खुरमपूर येथे सकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेत मृत पावलेल्या आजीचे नाव लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे (९०) असे आहे तर खून करणाऱ्या नातवाचे नामदेव बावराव नागरे असे नाव आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. गुरूवारी पहाटे नामदेवची आजी ही गाढ झोपेत असताना आरोपी नामदेव भावराव नागरे याने तिच्यावर घरातीलच विळ््याने वार करून गंभीर जखमी केले. त्यातच लक्ष्मीबाईचा मृत्यू झाला. मृत लक्ष्मीबाई नागरे या माजी सैनिकाच्या पत्नी असल्याने त्यांना पेन्शन मिळत होती. त्यामुळे त्यांनी पैसे द्यावे असा तगादा आरोपी नामदेव नागरे साततत्याने त्यांच्याकडे लावत होता.
या घटनेची माहिती गावात पसरताच आरोपी नामदेव नागरे याने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांनाही ग्रामस्थांनी या खुनाची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली.
दरम्यान, आरोपीली व्यसन असल्याने तो त्याच्या आजीकडे नियमित पैशाची मागणी करत होता. बºयाचदा त्याने तिच्याके दागिनेही मागितले होते. मात्र ते न दिल्याने आरोपी नामदेव भावराव नागरे याने तीन सप्टेंबर रोजी सकाळी विळ््याने सपासप वार करून आजीची हत्या केल्याची चर्चा ग्रामस्थामध्ये आहे. त्या आधारावर पोलिसांनी नामदेव नागरे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी सदाशिव लिंबाजी नागरे (६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केलाआहे. घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी अझरशेख हे करीत असून त्यांना हेड कॉन्स्टेबल बन्सी पवार, सुरेश बोरे, सचीन सौभागे, कैलास चतरकर, चंद्रशेखर मुरडकर, गजानन ठाकरे हे तपास करत आहे.