खोट्या सहय़ा करून अनुदान लाटले
By admin | Published: April 15, 2015 12:49 AM2015-04-15T00:49:53+5:302015-04-15T00:49:53+5:30
मेहकर येथील वसतिगृहाचा कारभार चव्हाट्यावर.
मेहकर (जि. बुलडाणा ) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या गृहपालाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून तसेच विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्या अनुदानाचा गैरवापर करून लाखो रुपये हडपल्याचे वास्तव समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाला १३ एप्रिल रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी भेट देऊन पाहणी केली असता, वसतिगृहाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अंघोळीसाठी जे पाणी वापरण्यात येते तेच मुलींना पिण्यासाठी देण्यात येते. पाण्याच्या एकाही टाकीवर झाकण नाही. घाणयुक्त पाणी आहे. पाण्याचा प्रत्यक्षात तुटवडा असतानाही रेकॉर्डवर मात्र दररोज दोन टँकर दाखवल्या जातात. मुलींना शासनाकडून येणारे कोणतेही साहित्य व गणवेश देण्यात आले नाहीत. विद्यार्थ्यांना खिचडी देऊ नये, असा सक्त आदेश असतानाही आठवड्यातील दोन वेळा विद्यार्थ्यांना खिचडीच देण्यात येते. मांसाहारी जेवणसुद्धा देण्यात येत नाही. वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींची संख्या कमी असल्यास रेकॉर्डवर जाणीवपूर्वक जास्त विद्यार्थिनी दाखवून अनुदान हडपल्या जाते. शासनाकडून मिळणार्या सुविधा मुलींपर्यंंत पोहचतच नाहीत. गृहपालाची तक्रार केल्यास त्या विद्यार्थिनींवर दबाव आणून त्यांना धमकावण्यात येते. शासनाच्या नियमाचे या वसतिगृहामध्ये उल्लंघन होत असून, विद्यार्थिनींचे हाल होत असल्याचे वास्तव आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता समोर आले आहे. तसेच तालुक्या तील खंडाळा देवी येथील मुलांच्या वसतिगृहामध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून विविध योजनांचे अनुदान हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणीसुद्धा पाण्याची दयनीय अवस् था आहे. पाण्याचा अभाव असल्यामुळे मुलांना ४ ते ५ दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे. गृहपालाचे कोणतेच नियंत्रण वसतिगृहावर नसून, शासनाकडून येणारे लाखो रुपये अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे आ. रायमुलकर यांनी उघडकीस आणले आहे. तरी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे. तसेच सदर प्रकरण विधानसभेत मांडणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, मेहकर येथील वसतिगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांंना सर्व सुविधा पुरविल्या जा तात. मध्यंतरी बँका बंद असल्याने थोडी असुविधा झाली होती. शासनाकडून येणार्या सर्व सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांंना देण्यात येत असल्याचे सांगीतले.