नविन विहीर, विहीर दुरूस्ती  व कृषि साहित्यासाठी मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:42 PM2017-10-14T13:42:31+5:302017-10-14T13:43:19+5:30

बुलडाणा - राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवगार्तील शेतकरी बांधवाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंमलात आणली आहे.

Grant for new well, well repaired and agricultural material | नविन विहीर, विहीर दुरूस्ती  व कृषि साहित्यासाठी मिळणार अनुदान

नविन विहीर, विहीर दुरूस्ती  व कृषि साहित्यासाठी मिळणार अनुदान

Next
ठळक मुद्दे  अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवगार्तील शेतकºयांना मिळणार लाभ  

बुलडाणा - राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवगार्तील शेतकरी बांधवाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंमलात आणली आहे. या योजनेतंर्गत शेतकºयांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना या प्रवगार्तील शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता अंमलात आणली आहे.   
 या योजनेतंर्गत नविन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरींग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच आदी बाबींकरीता अनुदान देण्यात येणार आहे. नविन विहीरीकरीता अनुदान मयार्दा २ लक्ष ५० हजार, जुनी विहीर दुरूस्तीकरीता ५० हजार, इनवेल बोअरींगकरीता २० हजार, पंपसंचसाठी २५ हजार, वीज जोडणी आकाराकरीता १० हजार, शेततळ्याचे  प्लॅस्टीक अस्तरीकरणकरीता १ लक्ष रुपए, ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपए व तुषार सिंचन संचाकरीता २५ हजार रुपए अनुदान देण्यात येणार आहे.
   या योजनेचा शेतक?्यांनी लाभ घेण्याकरीता किंवा अधिक माहितीसाठी तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषि विभागात, कृषि अधिकारी यांचेकडे आॅनलाईन अजार्साठी संपर्क साधावा. तसेच स्वयंसाक्षांकित केलेला अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात 31 आॅक्टोंबर २०१७ पूर्वी सादर करावे, असे आवाहन कृषि विभाग, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

Web Title: Grant for new well, well repaired and agricultural material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती