कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १०० रुपयांचे अनुदान मंजूर

By ram.deshpande | Published: July 26, 2017 01:39 AM2017-07-26T01:39:53+5:302017-07-26T01:42:33+5:30

Grant of Rs. 100 per quintal for onion-producing farmers | कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १०० रुपयांचे अनुदान मंजूर

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १०० रुपयांचे अनुदान मंजूर

Next
ठळक मुद्देमलकापूर, नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सहकार विभागाच्या ३ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकºयांना प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे.
शेतकºयांनी त्यांच्याकडील कांदा जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा येथे विक्री केलेला आहे. या पात्र शेतकºयांना सदर अनुदान मंजूर झाले असून, ही रक्कम थेट पात्र शेतकरी यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्र शेतकरी यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व आधार क्रमांक आदी तपशील संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा करावा, त्यानंतर अनुदानाची रक्कम तत्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सदर पात्र कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनी तत्काळ बँकेचा तपशील संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Grant of Rs. 100 per quintal for onion-producing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.