कृषी सहाय्यकांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:31+5:302021-05-21T04:36:31+5:30
कोरोना महामारीने थैमान घातले असून, तोंडावर आलेला खरीप हंगाम अशा परिस्थितीमध्ये कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गावपातळीवर काम करावे ...
कोरोना महामारीने थैमान घातले असून, तोंडावर आलेला खरीप हंगाम अशा परिस्थितीमध्ये कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गावपातळीवर काम करावे लागत आहे. परंतु कृषी सहाय्यकांना कोणत्याही प्रकारचा विम्याचा लाभ नाही. त्यांना शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केले नाही. कृषी सहायकांना कोविड १९ लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम देण्यात आलेला नाही. येणारा खरीप हंगाम पाहता कृषी सहायक वर्गात भीतीचे वातावरण झाले आहे. त्यातच आतापर्यंत तीन कृषी सहाय्यकांचा कोविडने मृत्यू झाला आहे. त्यावरून वरिष्ठांकडून जनसंपर्क वाढविण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. त्यामध्ये गावबैठका, प्रशिक्षण, शेतीशाळा अशी काम देण्यात येत आहेत. त्यामुळे कृषी सहायक संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. कृषी सहायक २४ ते २६ मे काळ्या फिती लावून कामकाज, २८ मे रोजी सर्व कृषी सहायक एक दिवसीय सामूहिक रजा, १ ते ४ जून कोणतेही अहवाल न देता असहकार पुकारतील. त्यानंतर जर अडचणीची सोडवणूक न झाल्यास आंदोलन तीव्र करणार आहेत. मृत्युमुखी पडलेल्या सर्व कृषी सहाय्यकांना ५० लाख सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. कृषी सहायक संघटनेचे संदीप शिंदे, विलास रिंढे, दीपक बोरे यांच्यासह कृषी सहायकांनी हे निवेदन दिले आहे.