पीएम किसान याेजनेचे अनुदान केले कर्ज खात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:11+5:302021-02-23T04:52:11+5:30
अंढेरा : पंतप्रधान सन्मान याेजनेंतर्गत मिळालेल्या दाेन हप्त्यांचे अनुदान कर्ज खात्यात जमा केल्याचा प्रकार २२ फेब्रुवारी राेजी उघडकीस ...
अंढेरा : पंतप्रधान सन्मान याेजनेंतर्गत मिळालेल्या दाेन हप्त्यांचे अनुदान कर्ज खात्यात जमा केल्याचा प्रकार २२ फेब्रुवारी राेजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
अंढेरा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. या शाखे अंतर्गत अंढेरा, सेवानगर, पिंपरी आंधळे, शिवणी आरमाळ, बायगाव, मेंडगाव, पाडळी शिंदे व सावखेड नागरे इत्यादी गावे येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी श्रावण बाळ लाभार्थी, निराधार, अपंग व इतर योजनांच्या लाभासाठी परिसरातील नागरिकांना शाखेत यावे लागते. ज्या ग्राहकांना पीएम किसान सन्मान योजनेंतर्गंत मिळालेले अनुदान कर्ज खात्यात जमा केल्याची तक्रार मेंडगाव येथील शेतकरी मुरलीधर वामन ढाकणे यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी पीएम किसान याेजनेच्या मदतीपासून वंचित राहिला आहे. या प्रकाराला अंढेरासह परिसरातील ग्राहक कंटाळले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
माझ्या बचत खात्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे
दोन हप्ते एकूण चार हजार रुपये बँकेने परस्पर कर्ज खात्यात जमा केले.
मुरलीधर वामन ढाकणे
शेतकरी,मेंडगाव
दिव्यांग, वयोवृद्धांची फरपट
ग्रामीण बँकेची शाखा पहिल्या माळ्यावर असल्याने वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना शाखेत जाण्यासाठी १२ ते १५ पायऱ्या असलेल्या जिन्याचा वापर करून तारेवरची कसरत करत शाखेत प्रवेश करावा लागतो. तसेच या शाखेत प्रवेश करतेवेळेस शाखेच्या मुख्य प्रवेशदारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले नाही. वयोवृद्ध व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वर चढून गेल्यानंतर बसण्यासाठी शाखेत बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही.
काेट
सदर शेतकऱ्याने कृषी संजीवनी याेजनेंतर्गंत वन टाइम सेटमेंट केली आहे. परस्पर खात्यातून रक्कम वळती करण्यात आलेली नाही.
प्रशांत वडतकर, शाखा व्यवस्थापक, विदर्भ काेकण ग्रामीण बँक, अंढेरा