स्मशानभूमीने कात टाकली!

By Admin | Published: August 20, 2015 11:58 PM2015-08-20T23:58:35+5:302015-08-20T23:58:35+5:30

हिवरा खुर्द येथील स्मशानभूमीचा लोकसहभागातून कायापालट.

Graveyard cut! | स्मशानभूमीने कात टाकली!

स्मशानभूमीने कात टाकली!

googlenewsNext

हिवरा खुर्द (जि. बुलडाणा): आयुष्यभर प्रपंचाच्या गोतावळ्यात अर्थकारणासाठी माणसाला धावपळ करावी लागते. मृत्यूनंतर त्याचा अखेरचा प्रवास शांततेत व्हावा, नातेवाईक व आप्तस्वकीयांना त्याला अखेरचा निरोप निसर्गरम्य वातावरणात देता यावा, यासाठी मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथे आगळेवेगळे शांतीधाम साकारण्यात आले आहे. येथील स्मशानभूमीत हिरवागच्च लॉन टाकून विविध जातीचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याने स्मशानाने कात टाकली आहे. हिवरा खुर्द गावातील लिंबवाडी परिसरात घाणीच्या विळख्यात असलेल्या दोन एकर जागेवर विलोभणीय अशी स्मशानभुमी साकारण्यात आली आहे. देवानंद पवार व पं.स.सदस्य दिलीप खरात यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट झाला आहे. हिरवागच्च लॉन, झाडा- पानाफुलांनी भरलेले दिसून येते. या स्मशानभूमीत गोल्डन पाईकार, रॉयल फार्म, आर.के.फार्म, पोक स्टाईल आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या स्मशानभूमीच्या लोकार्पण प्रसंगी श्री.श्री.श्री.१00८ हरिचैतन्य स्वामी महाराज यांनी आपल्या उद्बोधनात मृत्यूनंतर माणसासाठी नैसर्गिक सौंदर्यात त्याला शांततेत अखेरचा निरोप देण्यासाठी ही जागा व त्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याने, गावात सामाजिक एकोपा दिसून आला. ही बाब अत्यंत स्वागताहार्य असल्याचे त्यांनी प्रवचनात सांगितले. त्यानंतर स्वर्गधाममध्ये श्री शंकराच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Web Title: Graveyard cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.