बुलडाणा जिल्ह्यात भीषण आग; शेकडो जनावरे मृत्युमुखी
By admin | Published: April 2, 2017 02:01 AM2017-04-02T02:01:05+5:302017-04-02T02:01:05+5:30
३0 घरे जळाली; धान्यासह लाखोंचे नुकसान.
जानेफळ (जि. बुलडाणा), दि. १- येथून जवळच असलेल्या उटी येथे शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ३0 घरे जळून खाक झालीत. याशिवाय ४ बैल, ४0 बकर्या आणि काही कोंबड्या ठार झाल्याचे वृत्त आहे. आगीत घरांमधील धान्यदेखील जळून कोळसा झाले. यात लाखोंची संपत्ती नष्ट झाली.
शनिवारी रात्री उटी येथील ग्रामस्थ जेवण आटोपून झोपण्याच्या तयारी होते. अचानकच गावाच्या पश्चिमेकडून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पंडित पाटील धोटे यांच्या शेताजवळील लोकवस्तीला आगीने वेढा घातलेला दिसून आला. वार्यामुळे ही आग अधिकच वाढत चालली होती. आग एवढी भीषण होती, की चार बैल, ४0 बकर्या व काही कोंबड्या जळून कोळसा झाल्या. याशिवाय प्रल्हाद आंधळे, दिनकर आंधळे, चांदखाँ इनायत खाँ, इनायत खाँ अमीर खाँ, शहेनाजबी सरदार खाँ, हसीना बी रहीम खाँ, गणेश आंधळे, शे. हारुण शे. नूर, शे. हबीब शे. नूर, शे. नूर शे. चाँद, जुरावर खाँ पठाण, बंडू चांदणे यांची घरे जळून खाक झालीत. घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच धान्यदेखील जळून खाक झाले. चाँद खॉ इनायत खाँ यांच्या घरापासून आगीला सुरुवात झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुरुवातीला गावकर्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एक तासाने मेहकर येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.