खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:48 PM2019-02-04T13:48:32+5:302019-02-04T13:49:13+5:30

खामगाव :  राष्ट्रीय हरित प्राधीकरणाची बंदी झुगारून खामगावात पुन्हा एकदा कचरा जाळण्यात आला. १६ जानेवारी रोजी डंपींग ग्रांऊडवरील कचरा पेटविण्यात आल्यानंतर शहरातील उघड्यावरील कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावल्या जात आहे.

green tribunal rule break; corporation employee fire the garbage | खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा!

खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  राष्ट्रीय हरित प्राधीकरणाची बंदी झुगारून खामगावात पुन्हा एकदा कचरा जाळण्यात आला. १६ जानेवारी रोजी डंपींग ग्रांऊडवरील कचरा पेटविण्यात आल्यानंतर शहरातील उघड्यावरील कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावल्या जात आहे. श्रम वाचविण्यासाठी कचरा पेटविण्याचा फंडा वापरल्या जात असून, याकडे वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय हरित प्राधीकरणाने उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ फासत खामगाव पालिकेकडून वारंवार शहरात उघड्यावर कचरा पेटविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, १२ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्लास्टिक कचरा पेटविण्यात आला होता. त्यानंतर १६ जानेवारी २०१९ रोजी चक्क पालिका कर्मचाºयांनी आरोग्य निरिक्षकांच्या उपस्थितीत कचरा पेटविला होता. सोमवारी व्यापारी संकुलाजवळील कचरा एका स्वच्छता कर्मचाºयांकडून पेटवून दिला. 


 

आरोग्य निरिक्षकांकडून पाठराखण!

 डंपींग ग्रांऊडवर कचरा पेटविल्याचे बिंग फुटल्यानंतर मिथेन गॅसमुळे आग लागल्याचा बचाव त्यावेळी करण्यात आला. सोमवारी पालिकेच्या स्वच्छता कचरा पेटविलाच नाही. असे स्पष्टीकरण पालिकेच्या आरोग्य निरिक्षकांकडून दिले गेले. दरम्यान, १६ जानेवारी रोजी डंपीग ग्रांऊडवर कचरा पेटविल्याचे उघड होताच, तीन पैकी दोन आरोग्य निरिक्षकांनी ग्रांऊडवरून काढता पाय घेतला होता. त्यानंतर एक स्वच्छता निरिक्षक आणि चार कर्मचाºयांनी रस्ता स्वच्छतेचा ‘फार्स’ डंपींग ग्रांऊडवर रंगविला होता. कचरा जाळणाºया स्वच्छता कर्मचाºयांची पाठराखण वरिष्ठांकडून केल्या जाते. त्यामुळे शहरात उघड्यावर कचरा पेटविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, डपींग ग्राऊंडसोबतच सोमवारी आणि इतरही ठिकाणी पेटविलेल्या कचºयाच्या आणि पेटविणाºया स्वच्छता कर्मचाºयांचे सचित्र पुरावे लोकमतकडे उपलब्ध आहेत. हे येथे उल्लेखनिय!

 

कचरा पेटविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले जात नाही. कचरा पेटविणाºयांना तसेच स्वच्छता कर्मचाºयांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. एका कार्यक्रमाच्या तयारीसाठी आपण पालिकेच्या रुग्णालयात आहोत. व्यापारी संकुलाजवळ कचरा पेटविण्यात आल्याचे आपणाला माहिती नाही. 

- अनंत निळे, आरोग्य निरिक्षक, नगर परिषद, खामगाव.

Web Title: green tribunal rule break; corporation employee fire the garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.