दिव्य प्रकल्पाला ५१ हजारांची मदत देऊन बाळासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:38+5:302021-01-24T04:16:38+5:30
राज्यभरात निराधार, मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या दिव्या फाउंडेशनच्या दिव्यसेवा प्रकल्पाचे निर्माण कार्य सुरू आहे. ३ जानेवारीला बांधकामाला सुरुवात करण्यात आली ...
राज्यभरात निराधार, मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या दिव्या फाउंडेशनच्या दिव्यसेवा प्रकल्पाचे निर्माण कार्य सुरू आहे. ३ जानेवारीला बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. निराश्रितांसाठी हक्काचे आश्रयस्थान साकारले जात आहे. या सत्कार्यासाठी राज्यभरातून मदत अपेक्षित आहे. अनेकांनी फुल ना फुलाची पाकळी दिली असून, लवकरच दिव्य सेवा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुंबईच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष व नगरसेवक अनिल पाटणकर यांनी बुलडाणा येथील दिव्या फाउंडेशनतर्फे उभारण्यात येणाऱ्या आश्रमशाळेसाठी खारीचा, पण मोलाचा वाटा उचलत ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यावेळेस समाजसेविका मीनाक्षीताई पाटणकर, अनिल पटेल, महेश पालव, सुभाष रणदिवे, गजानन अवसरमोल व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.