राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन; जिजाऊ जन्मस्थळावरुन शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:56 PM2019-07-26T14:56:54+5:302019-07-26T14:57:04+5:30
सिंदखेड राजा: येथील मॉ साहेब जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या ३९० व्या स्मृती दिनानिमीत्त २५ जुलै रोजी शोभायात्रा व समाधी पुजनाचे आयोजन करण्यात आले होते
सिंदखेड राजा: येथील मॉ साहेब जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या ३९० व्या स्मृती दिनानिमीत्त २५ जुलै रोजी शोभायात्रा व समाधी पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन केले.
राजे लखुजीराव यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रथमता जिजाऊ मॉ साहेबांना अभिवादन करुन जिजाऊ जन्मस्थळावरुन शिवबा व मावळे या वेशभुषा तसेच ढोल ताशाच्या गजरात समाधीस्थळापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. सर्व मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेवुन अभिवादन केले. यावेळी शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी ही हिंदु राजाची सर्वात मोठी समाधी आहे. परंतु या स्थळाकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाधीचे चिरे ढासाळण्याच्या स्थितीत असून त्यावर वेरुळ-अजिंठा धर्तीवर रासायनीक प्रक्रीया करण्याची आहे. राजे लखुजीराव जाधव यांनी सिंदखेड राजा स्थीत मोती तलाव बांधला व सिंचनाची मोठी व्यवस्था केलेली आहे. आजही तो तलाव स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमासाठी राजे लखुजीराव जाधव शाळेचे विद्यार्थी तसेच राजीव गांधी हायस्कुलचे विद्यार्थी हजर होते. यावेळी राजे लखुजीराव जाधव यांचे वशंज तसेच माजी मंत्री राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अॅड. नाझेर काझी, शिवजीराव जाधव, राजेजाधव परीवार, संभाजी ब्रीगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह छगनराव मेहेत्रे, जगन ठाकरे, सतीश काळे, राजेंद्र अंभोरे, वैभव मिनासे, दिनकर बापु देशमुख, शिवाजी गव्हाड, संगीतराव भोगळ, नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)