बुलडाण्यात ४ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला दुकाने उघडी राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:07 PM2021-05-10T13:07:17+5:302021-05-10T13:07:51+5:30
जिल्हा प्रशासनाने हा निर्णय १० मे रोजी सकाळी घेतला आहे. नागरिकांची फरफट होऊ नये त्यांना आगामी दहा दिवसात अडचणी जाऊ नये म्हणून किराणा, भाजीपाला व अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाले
बुलडाणा : जिल्ह्यात १० मेच्या रात्री ८ वाजेपासून दहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना किराणा, भाजीपाला खरेदी करण्यासाठी १० मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने हा निर्णय १० मे रोजी सकाळी घेतला आहे. नागरिकांची फरफट होऊ नये त्यांना आगामी दहा दिवसात अडचणी जाऊ नये म्हणून किराणा, भाजीपाला व अनुषंगिक साहित्य खरेदीसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाले यासाठी मानवी दृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली. मात्र १० मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ११ मे पासून नागरिकांनीही अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना प्रतिबंध व त्याची साखळी तोडण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.