किराणा दुकानाला आग, दाेन लाखांचे नुकसान
By संदीप वानखेडे | Published: April 17, 2023 05:02 PM2023-04-17T17:02:19+5:302023-04-17T17:02:54+5:30
ही घटना १७ एप्रिल राेजी सकाळी १० वाजता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे घडली.
डोणगाव : शाॅर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागून २ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १७ एप्रिल राेजी सकाळी १० वाजता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे घडली.
शेलगाव देशमुख येथील संजय राजेकर हे कामानिमित्त दुकान बंद करून साेमवारी बाहेरगावी गेले हाेते. या दुकानातून सकाळी धूर बाहेर येत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले दुकानाचा दरवाजा उघडून पाहिला असता शाॅर्टसर्किटमुळे किराणा दुकानातील साहित्याला आग लागल्याचे समाेर आले. आग लागल्याचे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाण्याचे टँकर बाेलावले टँकरच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात ग्रामस्थांना यश आले. घटनेची माहिती मिळताच शेलगाव देशमुख महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी आर. आर. चनखोरे यांना भेट दिली. तलाठी बालाजी तिरके, जी. एस. .ढोणे,कोतवाल किशोर पातूरकर, भगवान बघे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीत झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला. यामध्ये किराणा दुकानातील किराणा मालासह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचे समाेर आले.