भुईमुगाला एका महिन्यात १००० रूपयांची भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:46 AM2020-06-23T11:46:15+5:302020-06-23T11:46:35+5:30

भुईमुगाच्या भावात गत एक महिन्यामध्ये तब्बल १००० रूपयांची वाढ झाली आहे.

Groundnut prices go up by Rs 1,000 a month | भुईमुगाला एका महिन्यात १००० रूपयांची भाववाढ

भुईमुगाला एका महिन्यात १००० रूपयांची भाववाढ

googlenewsNext

- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजरातमधून आलेल्या व्यापाऱ्यांकडून भुईमुगाची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे भुईमुगाच्या भावात गत एक महिन्यामध्ये तब्बल १००० रूपयांची वाढ झाली आहे.
गतवर्षी पावसाळ्यात बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ११४ टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमुगाची पेरणी केली. तसेच त्यांना उत्पन्नही चांगले झाले. यावर्षी शेतकºयांना एका एकरामध्ये १० ते १२ क्विंटल उत्पादन झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे भुईमुगाची विक्री रखडली होती. तसेच भावही कोसळले होते. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र वाहने बंद असल्यामुळे शेतकरी शेतमालाची विक्री करू शकले नाहीत. मात्र, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीला परवानगी दिली. खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये ९ मेपासून भुईमुगाची आवक सुरू झाली. सुरूवातीला कमी प्रमाणात आवक होती. तर भावही कमी होते. ९ मे रोजी ३१०० रूपये ते ४४०० रूपये प्रती क्विंटल भुईमुगाचे भाव होते तर केवळ १४० क्विंटल आवक होती. त्यानंतर गुजरातहून आलेल्या व्यापाºयांनी भुईमुगाची खरेदी सुरू केली. त्यामुळे भावामध्ये वाढ झाली. २२ जून रोजी ३६०० ते ५४३५ रूपये प्रतिक्विंटल भुईमुगाला भाव मिळाला. एका महिन्यात तब्बल १०३५ रूपये भाववाढ झाली आहे. भावात वाढ झाल्यामुळे आवकही वाढली. २३ मेपासून भुईमुगाच्या आवकमध्ये वाढ झाली. २३ मेपासून तर १३ जूनपर्यंत दरदिवशी ८ ते १५ हजार क्विंटलची आवक होत होती. सध्याही आवक सुरू असून, २२ जून रोजी ४०१४ क्विंटल भुईमुगाची आवक झाली.

जिल्ह्यातील भुईमुगाची खामगाव बाजार समितीत विक्री

गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भुईमुगाची पेरणी केली. शेतकºयांना भुईमुगाचे उत्पन्नही चांगले झाले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यानंतर शेतकºयांनी शेतमाल विक्रीला सुरूवात केली. जिल्ह्यातील शेतकरी खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत भुईमुग विक्रीकरीता आणीत आहेत. खामगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील शेंडगाव बाजार समितीत भुईमुगाची खरेदी करण्यात येते. त्यामुळे शेतकरी खामगाव बाजार समितीत विक्री करीत आहेत.


गतवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे आम्ही भुईमुगाची पेरणी केली. यावर्षी भुईमुगाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न झाले आहे. तसेच भावही चांगला आहे. खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.
- विजय देशमुख
शेतकरी, चायगाव, मेहकर


गत एक महिन्यामध्ये भुईमुगाच्या भावात चांगली वाढ झाली आहे. गुजरातमधून आलेले व्यापारी भुईमुगाची खरेदी करीत असल्याने चांगला भाव मिळत आहे. तसेच यावर्षी बाजार समितीत भुईमुगाची आवकही वाढली आहे.
- मुगूटराव भिसे
सचिव, कृ.उ.बा.स., खामगाव.

 

 

 

Web Title: Groundnut prices go up by Rs 1,000 a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.