रेशीम उद्योगाचा वाढतोय विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:28+5:302021-09-03T04:36:28+5:30
१ सप्टेंबर १९९७ रोजी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, उद्योग संचालनालय व विदर्भ विकास महामंडळ हे तिन्ही विभाग एकत्र ...
१ सप्टेंबर १९९७ रोजी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, उद्योग संचालनालय व विदर्भ विकास महामंडळ हे तिन्ही विभाग एकत्र करून रेशीम विभाग हा स्वतंत्र् रेशीम संचालनालय म्हणून कार्यरत झाला. रेशीम उद्योग आज चांगला नावारूपाला आला आहे. रेशीम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सहा. संचालक आर. टी. जोगदंड यांनी आर्थिक उन्नती होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तुती लागवडीचे आवाहन केले. २०२२-२३ मध्ये नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन ग्रामपंचायतीमार्फत कृती आराखड्यात नाव समाविष्ट केल्यानंतर अधिकृत तुती लागवड नोंदणीकरिता जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन केले.
एन. जी. साहू, एम. पी. घाटे, बी. एल. कुमावत, अविनाश खरसने, रामदास आटोळे, गुळवे रेशीम शेती सेवा व चॉकी सेंटरचे संचालक जगदिशचंद्र गुळवे व मुकुंंद पारवे यांनी शेतकऱ्यांना तुती लागवडीविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळवे यांनी केले. आभार एन. जी. साहू यांनी मानले.
तुती लागवडीला चालना
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तुती लागवडीचा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. रेशीम शेतीकडे अनेक शेतकरी वळले असून, हे जिल्हा रेशीम कार्यालयाचे मोठे यश आहे. जिल्ह्यात सध्या तुती लागवडीला चालना मिळत असल्याचे मत तुती लागवड शेतकऱ्यांनी व्यक्त केले.