सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

By सदानंद सिरसाट | Published: September 9, 2023 06:27 PM2023-09-09T18:27:05+5:302023-09-09T18:28:00+5:30

शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी शिव भजन गात जागृती करण्यात आली.

Growing support for the movement of the entire Maratha community, the second day of the movement in Khamgaon | सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

googlenewsNext

खामगाव (बुलढाणा) : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरासोबतच खामगावातही सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी शिव भजन गात जागृती करण्यात आली.

सकल मराठा समाज खामगावच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, ऑल इंडिया पँथर सेना, शिवभक्त कावड यात्रा व तानाजी व्यायाम शाळा छत्रपती शिवाजी महाराजनगर, सती फैल शिवभक्त कावडधारी मित्र मंडळ, हनुमान व्यायाम मंडळ, भगवान गोगा महाराज भक्त मंडळ शंकरनगर, तसेच खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील अनेक मंडळांनी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे, माजी नगराध्यक्षा अल्काताई सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने, तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी, अल्पसंख्याक न्याय व हक्क समिती खामगाव तालुकाध्यक्ष शेख जुल्करनैन शेख चांद, कार्याध्यक्ष लाईक खान, उपाध्यक्ष डॉ. गुफरान खान, सचिव अॅड. शहजाद खान, मो नईम, कोषाध्यक्ष शाफिउल्ला खान, संघटक मो वसीमोद्दीन, शब्बीर खान, कासिमअली खान, शेख इरफान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, तालुकाध्यक्ष नागसेन कवडे, तालुका सचिव प्रदीप तायडे शहराध्यक्ष समीर शेख यांनी पाठिंबा दिला.
 

Web Title: Growing support for the movement of the entire Maratha community, the second day of the movement in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.