जीएसटीमुळे औषधविक्री ठप्प!
By admin | Published: July 5, 2017 04:13 AM2017-07-05T04:13:10+5:302017-07-05T04:13:10+5:30
जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम तसेच अद्याप अद्ययावत न झालेल्या सॉफ्टवेअर आदीमुळे औषध कंपनी व डिलर यांनी नवीन
विवेक चांदूरकर/ लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम तसेच अद्याप अद्ययावत न झालेल्या सॉफ्टवेअर आदीमुळे औषध कंपनी व डिलर यांनी नवीन पुरवठा एक जुलैपासून थांबविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मेडीकल दुकान मालकांनी मागणी केली असली तरीही नवीन औषधे मिळेनाशी झाली आहेत.
नवीन करानुसार बिल देण्याचे सॉफ्टवेअर विकसित झालेले नाही. औषधी, किराणासह सर्वच प्रकारच्या वस्तू व मालाचा पुरवठा एक जुलैपासून ठप्प आहे. मॉलसह छोट्या दुकानांमध्येही प्रत्येक वस्तूला जीएसटी कर लागू करून तो डाटा संगणकात फिडींग करण्याचे काम करण्यात येत आहे. वस्तूंवर वेगवेगळा कर लावण्यात आला आहे. त्यामुळे बिल देताना अडचणी येत आहेत.