कृषीपंप वीज जोडणी धोरणबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:56+5:302021-03-14T04:30:56+5:30
कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० बाबत मासरुळ येथील ग्रामपंचायतमध्ये कनिष्ठ अभियंता कायंदे यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत कृषीपंप वीज जोडणी ...
कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० बाबत मासरुळ येथील ग्रामपंचायतमध्ये कनिष्ठ अभियंता कायंदे यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत कृषीपंप वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्यांना कृषीपंपा वीज जोडणी देण्यात येत आहे. १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांकरिता योजना अस्तित्वात नाही. सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या उच्चदाब वितरण प्रणालीची प्रगती, इतर पद्धतीने वीज जोडणी देण्यावर येणारी मर्यादा याचा विचार करता या पुढे संभाव्य कृषीपंप योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामध्ये कृषीपंपांना विकेंद्रित सौरऊर्जीकरणाच्या माध्यमातून दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्यासंबंधीचे नियोजन करणे, वितरण हानी टाळण्यासोबतच उपलब्ध वितरण प्रणालीचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने कॅपॅसिटर बसविणे, कृषी ग्राहक थकबाकी वसूल करणे, ही थकबाकी वसुलीकरिता ग्रामपंचायत, ग्रामविद्युत व्यवस्थापक, महावितरण कर्मचारी, शेतकरी सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देणे आदी बाबी कृषीपंप धोरणात समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. नवीन वीज जोडणी प्रकल्पाची माहिती देऊन राहिलेली थकबाकी ही त्यांच्या टक्केवारीनुसार भरण्याचे कायंदे यांनी आवाहन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित शेतकरी शेषराव सावळे, नंदकिशोर देशमुख, मधुकर महाले, मधुकर सिनकर, सुभाष पवार, संभाजी देशमुख, विठ्ठल बोडखे, प्रकाश लांडे, दीपक देशमुख, देवराव कापरे, सुखलाल सिनकर, दिलीप माळोदे व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.