कीड नियंत्रणासाठी बांधावर जावून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:26 PM2017-07-21T13:26:16+5:302017-07-21T13:26:16+5:30
शेतकºयांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषि विभागाच्यावतीने शेतकºयांच्या$d$बांधावर जावून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हिवराआश्रम : सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या व पाने खाणाऱ्या किडींचा
प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यापासून होणार नुकसान टाळण्याकरिता
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या
बांधावर जावून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सोयाबीन पिकावर प्रामुख्याने उंटअळी, स्पोडोप्टेरा, चक्रभुंगा
यासारख्या भयानक किडींचा प्रादुर्भाव येऊन अतोनात नुकसान होत असते. मात्र
या किडींचा प्रादुर्भाव येण्यापूर्वीच पीक संरक्षणाची काळजी घेणे हितावह
असते. याकरीता सदर किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाहून वेळीच
उपाययोजना कराव्यात, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करण्यात येत आहे. कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेहकर तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या शेतात जावून सध्या कोणत्या किडींचा प्रादुर्भाव याची माहिती
घेवून त्यावर उपाययोजना सांगत आहेत.
सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये चक्रभूंगा, खोडमाशी यांचा
समावेश होतो. पाने खाणाऱ्या किडीमध्ये उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी,
केसाळ अळी यांचा समावेश होतो. चक्रभूंगा, खोडमाशी या किडीसाठी ईथिआॅन ५०
ई.सी. ३० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ई.सी. १२.५ मिली किंवा प्रोफेनोफॉस
५० ई.सी. २० मिली किंवा थायक्लोरोप्रीड २१.७ एस.सी. १५ मिली प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी व पावर स्प्रे पंपाच्या
सहाय्याने फवारणी करताना त्याची मात दुप्पट वापरावे तसेच उंट अळी व
स्पोडोप्टेरा या किडीसाठी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास
एन्डोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ६ मिली किंवा क्लोरानट्रनीलीप्रॉल १८.५ एस.सी.
३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. पावर
स्प्रे वापरल्यास कीडनाशकाचे प्रमाण तिप्पट करावे, अशी माहिती उपविभागीय
कृषी अधिकारी गणेश भागवत गिरी यांनी दिली आहे.