शेतकऱ्यांना फळ पिकाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:10+5:302021-09-22T04:38:10+5:30
रस्त्यात हातगाड्या लावून रहदारीला अडचण बुलडाणा : वाढलेल्या बुलडाणेकरांना जुना आठवडी बाजार सध्या परवडेनासा झाला असून, रविवारीही आता हमखास ...
रस्त्यात हातगाड्या लावून रहदारीला अडचण
बुलडाणा : वाढलेल्या बुलडाणेकरांना जुना आठवडी बाजार सध्या परवडेनासा झाला असून, रविवारीही आता हमखास गर्दी करणारा बाजार भरत आहे. कोरोना संपला, असे प्रशासनाने अजून जाहीर केले नाही व नियमांच्या पालनाचेही निर्बंध घातलेले आहेत. मात्र, आठवडी बाजारात हे सर्व नियम डावलले जात आहेत. रविवारी तर मध्येच हातगाड्या लावून विक्रेते रहदारीस अडचण आणत आहेत. त्यामुळे पायी चालणेही कठीण होत असल्याचा प्रत्यय येत आहे. नगर पालिका प्रशासन मात्र सुस्त आहे, अन् हा बाजार पालिकेसमोरच भरत आहे.
मजदूर संघटनेची कार्यकारिणी बरखास्त
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा मजदूर संघटनेच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मधुकर जोगदंड होते. बैठकीमध्ये संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सर्वानुमते बरखास्त करण्यात आली. बैठकीला बबन गादे, राजू हिवाळे, सुधाकर बावणे, शेख अन्वर, मुकेश रेड्डी आदी पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीची निवड करण्याकरिता कामगारांच्या हितासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर जोगदंड यांनी केले आहे.