शिवार संवादातून शेतकºयांना मार्गदर्शन

By admin | Published: June 1, 2017 02:39 PM2017-06-01T14:39:41+5:302017-06-01T14:39:41+5:30

शेतकरी बांधवासाठी शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आलेआहे.

Guidance to farmers from Shivar dialogue | शिवार संवादातून शेतकºयांना मार्गदर्शन

शिवार संवादातून शेतकºयांना मार्गदर्शन

Next

बुलडाणा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वात
भारतीय जनता पार्टी चे राज्य सरकारला अडीच वर्ष पूर्ण झालीत. या अडीच
वर्षाच्या कार्यकाळात भाजपा सरकारने अनेक शेतकरी हिताच्या योजना
राबविल्या. या योजनांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी व त्यांनी या योजनांचा
अधिकाधिक लाभ घ्यावा. तसेच बळीराजाची कर्जातून कायम मुक्ती व्हावी यासाठी
ह्यशाश्वत शेती समृद्ध शेतकरीह्ण हा नारा देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक
गावातील शिवारात शेतकरी बांधवासाठी शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आले
आहे.
बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजपा नेते योगेंद्र गोडे यांचे उत्कृष्ठ
नियोजनातून व प्रत्यक्ष उपस्थितीमधून २५ मे पासून या अभियानाला बुलडाणा
तालुक्यातील सव येथून सुरुवात झाली व ३० मे रोजी गुम्मी, जनुना, चौथा, मढ
या गावांमध्ये शिवार संवाद सभा यशस्वीरित्या पार पडल्या. या सभांना सदर
गावांमधून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना
योगेंद्र गोडे म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी
तीनशेहून अधिक उपयुक्त योजना आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांची माहिती घेवून
लाभ घ्यावा व आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन
केले.
राज्यातील भाजपा सरकारला नुकतेच अडिच वर्ष पुर्ण झाले असून यादरम्यान
कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आज शासनाकडून
शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. रासायनिक खते व
बियाणे शासनाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना कृषी
अवजारांवर सबसिडी असून सदर सबसिडी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा
होत आहे. या शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पुरवठा सुरू केला आहे.
शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत बिनव्याज पिक कर्ज पुरवठा करण्यात येतो. या
शासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून लोकप्रिय
ठरली आहे. तसेच नुकतीच सुरू करण्यात आलेली ह्यगाळ मुक्त धरण व गाळ युक्त
शेतीह्ण या योजनेमुळे शेतकरी समृद्ध होणार आहे. या सर्व कल्याणकारी
योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी सदर शिवार संवाद
सभामध्ये शेतकऱ्यांना केले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व
त्यांना येणाऱ्या अडचणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास योगेंद्र
गोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बुलडाणा तालुका भाजपा अध्यक्ष अ‍ॅड.मोहन पवार यांनीही मार्गदर्शन
केले. या शिवार सभांना कुंदन गायकवाड, पंजाबराव सोर, फिरोज बेग, दीपक
रुस्तके, पंजाबराव नरोटे, प्रभू जैस्वाल, रघुनाथ नरोटे, बापुराव नरोटे,
अमोल बारवाल, पंजाबराव गायकवाड, गणपत जगताप, गजानन गायकवाड, हरिभाऊ
गायकवाड, गजानन पाटील, किसन पाटील, डॉ.संतोष कोंडे, संतोष गायकवाड, शोभा
गायकवाड, वंदना शेळके, यमुना गायकवाड, सुमन जगताप, अनिता दोड, प्रकाश
पवार, रवी धनावत, अभिमन्यू जाधव, मंगल चांदा, शेरखान बागुल, वैजीनाथ
राजगुरे, विनोद पवार यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Guidance to farmers from Shivar dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.