पाणी व्यवस्थापनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:49+5:302021-02-27T04:46:49+5:30
हवामानअनुकूल पीक पद्धती, पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन व कृषी तंत्रज्ञान अवलंबन प्रकल्प २०२०-२१ च्या माध्यमातून सिनगाव जहांगीर येथील शेतकरी गंगाधर ...
हवामानअनुकूल पीक पद्धती, पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन व कृषी तंत्रज्ञान अवलंबन प्रकल्प २०२०-२१ च्या माध्यमातून सिनगाव जहांगीर येथील शेतकरी गंगाधर डोईफोडे यांच्या शेतातील ज्वारी व इतर पिकांची पाहणी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केली. यावेळी कृषी निरीक्षक अनिल जाधव, पर्यवेक्षक रमेश मोरे, कृषी सहायक नंदकिशोर शिंगणे, कृषी सहायक आर. डी. मेहेत्रे यांची उपस्थिती होती. यावेळी यदुलवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेती करण्याचे तंत्र समजून घ्यायला हवे. योग्य वेळी योग्य नियोजन असेल तर शेती कधीच तोट्याची ठरणार नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचा चमू सतत कार्यरत आहे.
हवामानाच्या बदलानुसार अनिष्ट परिणाम भोगावे लागतात, याबाबत काय दक्षता घ्यायला हवी, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकरी शरद डोईफोडे, आनंद डोईफोडे, विजय कव्हळे, गणेश डोईफोडे, संतोष डोईफोडे, रामू बंगाळे, ज्ञानेश्वर बंगाळे, प्रमोद डोईफोडे, बाबासाहेब काकड, देवराव काळे, आदींची उपस्थिती होती.