विद्यार्थ्यांंना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

By admin | Published: August 26, 2015 11:34 PM2015-08-26T23:34:26+5:302015-08-26T23:34:26+5:30

पाठबळ फाउंडेशनचा पुढाकाराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणांना मिळतोय दिलासा.

Guidance for students exam competition | विद्यार्थ्यांंना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

विद्यार्थ्यांंना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांंना स्पर्धा परीक्षांसोबतच खासगी शिकवणीच्या माध्यमातून विनामूल्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पाठबळ फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यामुळे आत्मह त्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांंना शिक्षणाच्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही. पाठबळ फाउंडेशनच्यावतीने आशिष लहासे व संदीप गायकवाड यांनी पुढाकार घेत शहरातील खासगी क्लासेसच्या संचालकांना यासाठी सहकार्याचे आवाहन केले. शहरातील काही कोचिंग क्लासेसनी या आवाहनाला सकारात्मक प्र ितसाद देत आठवी ते बारावीपासून तर थेट स्पर्धा परीक्षांपर्यंंंत मोफत मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांंना पाठबळ फाउंडेशनच्यावतीने संबंधित क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध होईल. टंकलेखन तसेच एमएससीआयटीचे प्रशिक्षणही मोफत दिले जात आहे. यासाठी नितीन जाधव, अजय चव्हाण, राजेंद्र काळे, अजय बिलारी, रणजितसिंह राजपूत, बाळू ठाकरे, संदीप वंत्रोले यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Guidance for students exam competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.