किनगाव जट्टू येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:28 AM2021-07-25T04:28:57+5:302021-07-25T04:28:57+5:30
शिष्यांसाठी आपले गुरूच्या प्रति कृतज्ञता, श्रद्धा व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा असतो. त्याच हेतूने साखरखेर्डा येथील सद्गुरू प्रल्हाद महाराज ...
शिष्यांसाठी आपले गुरूच्या प्रति कृतज्ञता, श्रद्धा व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा असतो. त्याच हेतूने साखरखेर्डा येथील सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थांमध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येत होती. त्या कार्यक्रमाला किनगाव जट्टू येथून बहुसंख्येने गुरुभक्त कार्यक्रमात सहभागी होत होते. परंतु कोरोना संसर्ग आजारामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी कार्यक्रमावर बंदी घातली. परिणामी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द केला असल्याने किनगाव जट्टू येथील सद्गुरू भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवून श्रीराम मंदिराच्या सभागृहात सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. सर्व गुरुभक्तांनी अभिषेक करून पूजाअर्चा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथ बिनीवाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला रवी बिनीवाले, श्रीराम बिनीवाले, संपतराव जाधव, श्याम कराडकर, राजू जावळे, रमेश कुलकर्णी, देविदास देशमुख, श्रीराम राऊत, संजय महाजन, सोनू शिनगिरकर गुरुभक्तांसह महिलांची उपस्थिती होती. तीर्थप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.