गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा : शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:24+5:302021-07-02T04:24:24+5:30

स्थानिक विश्राम गृहावर अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती ...

Gutkha mafia smiles: sniffing | गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा : शिंगणे

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा : शिंगणे

Next

स्थानिक विश्राम गृहावर अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. जी. अण्णापुरे, अकोल्याचे सहायक आयुक्त एस. डी. तेरकर, अमरावती व यवतमाळचे सहायक आयुक्त के. आर. जयपूरकर, बुलडाणा सहायक आयुक्त एस. डी. केदारे यांच्यासह विभागातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमरावती विभागात केलेल्या कारवायांचा आढावा डॉ. शिंगणे यांनी घेतला. त्यानंतर अमरावती, अकोला, बुलडाणा येथील गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले. परंतु, आता याकडे दुर्लक्ष होता कामा नये. गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच जनतेला हायजेनिक अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न पदार्थ तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. खवा, मिठाई यामध्ये प्रामुख्याने भेसळ होत असते त्याचीदेखील तपासणी करण्यात यावी. काही व्यावसायिक खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करतात. या तेलामध्ये तळलेले खाद्यपदार्थ खाल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकाच तेलाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर करवाई करावी. किराणा दुकानाच्यादेखील नियमित तपासण्या कराव्या. यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. शिंगणे यांनी दिला आहे.

Web Title: Gutkha mafia smiles: sniffing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.