दाेन बिबट्यांचा नागरी वस्तीत हैदाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:09+5:302021-05-12T04:36:09+5:30
बुलडाणा : शहरातील क्रीडा संकुल परिसरात दाेन बिबट्यांनी १० मे राेजी रात्री हैदाेस घातला़, तसेच एका पाळीव श्वानावर ...
बुलडाणा : शहरातील क्रीडा संकुल परिसरात दाेन बिबट्यांनी १० मे राेजी रात्री हैदाेस घातला़, तसेच एका पाळीव श्वानावर हल्ला केल्याने, या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी बिबटे आढळले हाेते. क्रीडा संकुल परिसरात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या गेल्या ९ वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या घरात दाेन बिबट्यांनी साेमवारी रात्री ८ वाजता प्रवेश केला. या बिबट्यांनी घरातील कबुतरे फस्त केली, तसेच काेंबड्यांवर हल्ला केला. मात्र, काेंबड्या उडाल्याने बचावल्या, तसेच हर्षवर्धन सपकाळ यांचा पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. ही बाब शेजाऱ्यांनी सपकाळ यांना सांगितली. सपकाळ यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली असता, एका बिबट्याने श्वानाला पकडलेले आढळले. चारचाकीच्या लाइटमुळे बिबट्याने श्वानाला साेडले. अर्ध्या तासाने पाळीव कुत्र्याला साेडविण्यात यश आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्वानाला सपकाळ यांनी तातडीने डाॅक्टरांकडे उचपारासाठी नेले. त्यानंतर, रात्री १० नंतरही या परिसरात बिबट्यांचा मुक्काम हाेता. नागरी वस्तीत बिबट्यांनी हल्ला केल्याची ही बुलडाणा शहरातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या वावरामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़
सुदैवाने मनुष्यहानी टळली
हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्माणाधीन घरावर रात्री त्यांच्या कुटुंबातील एक जण झाेपायला जात हाेते. सुदैवाने साेमवारी रात्री कुणीही गेले नव्हते. या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असताे. त्यात आता बिबट्यांचीही भर पडली आहे.