‘स्वाईन फ्लू’चा हैदोस, कलेक्टरने घ्यावी दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:04 AM2017-07-20T00:04:21+5:302017-07-20T00:04:21+5:30

शहर आणि जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’ या भयंकर आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला असताना आरोग्य खाते मात्र आकडेवारी लपविण्याच्या प्रयत्नात आहे.

Haidos of the 'swine flu', the collector should take it | ‘स्वाईन फ्लू’चा हैदोस, कलेक्टरने घ्यावी दखल

‘स्वाईन फ्लू’चा हैदोस, कलेक्टरने घ्यावी दखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागलेले असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ५४ शिक्षकांची पदे रिक्त असून, शिक्षकांची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही राज्यात सन गेल्या सात वर्षात शिक्षक भरती झालेली नाही, त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची १५ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ लोणार तालुक्यालाही अनेक वर्षांपासून रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक असे एकूण ५४ जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणारी मुले ही ग्रामीण भागातील गरीब परिस्थितीतील असतात. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला नाही तर त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरल्यास इतर शिक्षकांवरील ताण कमी होऊन तेही उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवू शकतील. मोफत शिक्षण, आहार, पुस्तके अशी ओळख जिल्हा परिषद शाळांची झालेली आहे; मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तम शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा लोंढा आजही इंग्रजी शाळेकडे जाताना दिसत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असल्याने कार्यरत शिक्षकांवरही कामाचा ताण वाढत आहे.

आदिवासीबहुल गावातील शाळा एक शिक्षकी
शिक्षकांची मोठ्या संख्येने पदे रिक्त झाल्याने अनेक शाळा या एक शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांवर अध्यापनाचा मोठा ताण येत आहे. परिणामी, शिक्षकाची ससेहोलपट होत आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. दुर्गम भागात ही स्थिती मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासीबहुल गावांमधील शाळा सर्रास एकशिक्षकीच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Haidos of the 'swine flu', the collector should take it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.