पांग्री काटे परिसरात गारपीट, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:03+5:302021-03-21T04:34:03+5:30
साखरखेर्डा, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, लिंगा, बाळसमुंद्र, राजेगाव, जागदरी, जनुना, सावंगी भगत, शेंदुर्जन या परिसरात शुक्रवारी रात्री ...
साखरखेर्डा, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, लिंगा, बाळसमुंद्र, राजेगाव, जागदरी, जनुना, सावंगी भगत, शेंदुर्जन या परिसरात शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास वादळासह पाऊस पडला. पांग्रीकाटे येथे गारपीट झाली. वादळामुळे अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले. ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने शेतमाल भिजला आहे. पांग्रीकाटे येथील श्रीहरी थिगळे, गजानन काटे, दिलीप थिगळे, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर काटे, अंबादास काटे, लिंबाजी थिगळे, विजय थिगळे, अंबादास पंचाळ, भीमराव गवई, नंदू काटे यासह अनेक शेतकऱ्यांनी बिजवाई कांदा लागवड केली होती. या गारपिटीचा फटका बसल्याने १०० टक्के नुकसान झाले आहे. आज कृषी अधिकारी पथकाने नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काटेपांग्री येथील शेतकऱ्यांनी केली आहे.